ग्राफिटी'तील मजकूर निषेधार्ह
ता. 26 नोव्हेंबरची "ग्राफिटी' वाचली. पुरुषांच्या दृष्टिकोनातून स्त्री हा नेहमीच विनोदाचा विषय ठरली आहे, सगळ्यांना हे माहितीही आहे. खासगीत ते सहजपणाने घेतलेही जाते. (स्त्रियांना सिस्थ सेन्स असल्यामुळेच असेल.) पण "सकाळ'सारख्या वृत्तपत्रात अशा प्रकारे एकूणच स्त्रियांबद्दल असा मजकूर प्रसिद्ध व्हावा? तरी सध्या स्त्री वेळोवेळी व ठिकठिकाणी स्वतसिद्ध करत असताना अशा प्रकारची "ग्राफिटी' सकाळमध्ये प्रसिद्ध होते, हे एक स्त्री म्हणून आम्हाला निषेधार्ह वाटते. केवळ निषेधार्ह नव्हे, तर अपमानकारक वाटते. आज जगात वावरताना आजूबाजूला "सिस्थ'च काय अजिबात कुठलाच सेन्स नसलेले पुरुष हरघडी, हरक्षणी दिसतात; मग त्यांच्याबद्दल काय? तरीही पुरुषांबद्दलही असे छापून यावे, असे आमचे अजिबात म्हणणे नाही. (प्रसिद्ध होणारा मजकूर कुणालाच अपमानकारक नसावा, हा हेतू; सिस्थ सेन्स' म्हणा हवा तर).
- शैलजा पटवर्धन, अंजली सातपुते, अनुश्री लिमये.
`सकाळ`, ता. २८.११.२००७
-----------------------------------
कॉमेंट नव्हे कॉम्प्लिमेंट!
"बायकांकडे सिक्स्थ सेन्स असतो म्हणे; पहिल्या पाचांबद्दल बोलायचं नाही' या "ग्राफिटी'चा मी घेतलेला अर्थ असा ः स्त्री-पुरुष सर्वांना असणारे आधीचे सामान्य पाच सेन्स तर स्त्रीला आहेतच, त्याबद्दल बोलायचेच नाही; पण एक विशेष असा सहावा सेन्सही आहे जो बिच्चाऱ्या पुरुषांना नाही. आजची स्त्री ही शिक्षित, समाजातल्या वेगवेगळ्या थरांत वावरणारी, अनेक जबाबदाऱ्या लीलया पेलणारी, सुजाण आहे. अशा सहज विधानांनी अपमानित होण्याइतकी हलक्या मनाची ती निश्चितच नाही. कोणी जर अशी "कॉमेंट' केली तर ती "कॉम्प्लिमेंट'मध्ये बदलून घेण्याचा सिक्स्थ सेन्स तिच्यात असलाच पाहिजे.
- इंद्रायणी चव्हाण
-----------------
हा शब्दांचा खेळ...
आजपर्यंत वेगवेगळ्या नात्यांवर, घटनांवर अतिशय मार्मिक टिप्पणी करणारी "ग्राफिटी' आपण वाचत आलोय. त्यामध्ये कोणालाही दुखवण्याचा हेतू कधीच जाणवला नाही. हा शब्दांचा खेळ आहे. या खेळाची मजा घ्यायची की रडीचा डाव खेळायचा हे वाचकाला विनोदाचा "सेन्स' किती आहे यावर अवलंबून आहे.
- सुनीता कुलकर्णी
`सकाळ`, ता. ०८.१२.२००७
Monday, December 10, 2007
Sunday, October 21, 2007
भाषासौंदर्याचा आविष्कार
"ग्राफिटी' भाषासौंदर्याचा आविष्कार
"सकाळ'च्या "प्रसन्न' या सदरातून रोज एक नवी "ग्राफिटी' येते. वृत्तपत्रातील केवळ 2-3 इंचाची जागा; पण तिने मनात एक स्वतःची जागा निर्माण केली. रोजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या, संघर्षाच्या जीवनात ग्राफिटीने चेहऱ्यावर नवे रंग फुलवले. कधी हसवणारी, फसवणारी तर कधी मन फुलवणारी, कधी स्वप्नात झुलवणारी, कधी बोट धरून चालवणारी, तर कधी विचार करायला लावणारी, कधी कोपरखळी मारणारी, कधी शब्दाने भंडावून सोडणारी अशी ही "ग्राफिटी' नकळत वाचकांना खदखदून हसवणारी तर कधी खरचटे असं आहे असं वाटून मनातल्या मनात मनसोक्त हसवणारी अशी आहे.
श्री. अभिजित पेंढारकर व प्रभाकर भोसले यांचे संकलन लेखन अतिशय छान असेच आहे. पण, "सकाळ'ने पुस्तक रूपात निर्माण केलेले भाग-1 व भाग -2 ही दोन पुस्तके सहज पाकिटात मावणारे आणि वेळ मिळेल तेव्हा पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटणारे सुंदर पॉकेटबुक आहे. काही सर्वोत्कृष्ट ग्राफिटी 1जाने. "आज फक्त शुभेच्छा! उद्यापासून अपेक्षा', "आपण तरुण आहोत असा विचार मनात येत असेल तर... तुम्ही नक्की म्हातारे आहात!', "पैशाने पैसा येतो हे ठीक आहे. पण, पहिला पैसा कसा येणार?', "मुक्तपणा आणि स्वैराचार यांच्यातला फरक शिकवते, ते खरे स्वातंत्र्य', "गरजा कमी असणे, हीच आमची खरी गरज', "वाढदिवसाला सगळे "विश' का देतात?' अशा अनेक सुंदर ग्राफिटींचे संकलन मनभावन आहे.
सकाळच्या ग्राफिटीच्या यशाला हजारो रसिक वाचकांच्या शुभेच्छा!
- सौ. संगीता सुनील वाईकर, बजाजनगर, नागपूर - 10.

Tuesday, October 2, 2007
ग्राफिटी नगरच्या भेटीला...
नगरकरांचे हास्य फुलवत प्रत्यक्ष अवतरली "ग्राफिटी'
नगर, ता. 1 ः "सावधान... पुढे चांगला रस्ता आहे...' "मुलगा आणि नारळ कसा निघेल, हे आधीच सांगता येणं अवघड आहे...' "आयुष्यात चार माणसं तरी जोडावीत, "शेवटी' उपयोगाला येतात...' अशा अफलातून, कळीच्या वाक्यरचना सादर होत होत्या. रसिकहृदयात स्थान मिळवणारी "ग्राफिटी' प्रत्यक्ष अवतरत होती... अन् त्याबरोबर उसळत होती हास्याची कारंजी. मिळत होती टाळ्यांची उत्स्फूर्त दाद!

येथील उदय एजन्सीतर्फे सांस्कृतिक क्षेत्रातील सृजनशील व्यक्तित्त्वांशी "उदय-संवाद' ही गप्पांची मालिका सुरू करण्यात आली. त्याअंतर्गत "ग्राफिटी आपल्या भेटीला' ही पहिली मैफल येथील रावसाहेब पटवर्धन सभागृहात झाली. "सकाळ'मधून लोकप्रिय झालेल्या "ग्राफिटी' सदराचे लेखक-संकलक अभिजित पेंढारकर व अक्षररचनाकार प्रभाकर भोसले यांच्याशी "सकाळ'चे ज्येष्ठ उपसंपादक अभय न. जोशी यांनी संवाद साधला. प्रमुख पाहुणे म्हणून "सकाळ'चे मुख्य बातमीदार बाळ ज. बोठे उपस्थित होते.
"ग्राफिटी' म्हणजे नेमकं काय, तिचा जन्म कसा झाला, वाचकांच्या कशा प्रतिक्रिया मिळाल्या, पुस्तकाचे कसे स्वागत झाले, काही "ग्राफिटी' कशा सुचल्या... अशा रसिकांच्या मनातील उत्सुक प्रश्नांची उत्तरे पेंढारकर अन् भोसले यांनी दिलखुलासपणे दिली. त्यामुळे ही संवाद मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. "ग्राफिटी' म्हणजे कुठल्याही मोकळ्या जागेवर भावना व्यक्त करण्याची कला.
युरोपीय देशांत तिचा जन्म झाला, अशी रंजक माहिती पुरवत पेंढारकर यांनी निवडक "ग्राफिटीं'चे वाचन केले. भोसले यांनी निवडक "ग्राफिटीं'चं अक्षरलेखनाचं प्रात्यक्षिक सादर करून दाद मिळवली. उपस्थित रसिकांनीही "ग्राफिटी'कारांशी संवाद साधला. उदय एजन्सीचे संचालक वाल्मीक कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात "उदयसंवाद'विषयी माहिती दिली, तसेच संस्थेच्या आतापर्यंतच्या उपक्रमांचा आढावा घेतला. श्री. बोठे यांनी मनोगत व्यक्त केले. सरिता कुलकर्णी यांनी आभार मानले. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अनुजा कुलकर्णी यांनी पसायदान सादर केले.
---सावधान... पुढे चांगला रस्ता आहे!
श्री. पेंढारकर यांनी मैफलीच्या सुरवातीलाच स्पष्ट केले, की पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांवर आम्ही "सावधान, पुढे चांगला रस्ता आहे' ही "ग्राफिटी' लिहिली होती. मात्र, नगरचे रस्ते पाहून पुणेकरांचा त्रास फारच सुसह्य असल्याचे जाणवले. श्री. भोसले यांनी हीच ग्राफिटी अक्षरलेखनातून सादर केल्यानंतर रसिकांची भरभरून दाद मिळाली. नगरच्या महापालिकेत ती लावावी, अशी उत्स्फूर्त सूचनाही आली. .........................................................
Wednesday, August 29, 2007
सलाम ग्राफिटी!
सलाम ग्राफिटी!
"सकाळ'ची प्रत्येक ग्राफिटी गहिरे रंग घेऊनच भेटीला येत असते. कधी उपहास तर कधी विरोधाभास, कधी रेशीमचिमटा तर कधी जाणवण्याएवढा धक्का. कधी समाजजीवनावर मार्मिक टिप्पणी करता करता वर्मावर नेमके बोट ठेवणारी, तर कधी मानवी प्रवृत्तीची अचूक नाडी ओळखणारी. कधी विनोदाचा शिडकावा, तर कधी ढोंगीपणावर प्रहार करणारी. वाचकाचे बोट धरून अलवार पावलांनी चालायला लावणारी, तर कधी चालता चालता पायाखालची वाटच काढून घेणारी. बोचरी, गंभीर, मिस्कील, खोडकर ही तिची रूपं विलोभनीय वाटतात. मोजक्याच शब्दांतून वैचारिक व भावनिक कल्लोळ निर्माण करत, शाश्वत सत्याला स्पर्श करत वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या ग्राफिटीला सलाम!
- प्रा. वामन बोरकर, पुणे.

Friday, August 24, 2007
हे गोयंच्या भूमीचं...

ग्राफिटी - एक डोकेबाज साहित्यिक नवलाई
अलीकडेच सुरू झालेला ग्राफिटी हा इंग्रजी नावाने इंग्रजाळलेला पण पूर्णपणे मराठी मिश्किलीने खुदकन चेहऱ्यावर हास्य आणणारा व विचार करायला लावणारा नावीन्यपूर्ण प्रकार रोजच्या वृत्तपत्र वाचनात टोलवाटोलवी किंवा चिंटू या छोट्यांची मोठ्यांनी चालवलेल्या व्यंगचित्रमालिकेसारखाच. वाईट बातम्या वाचून मनावर आलेले चिंतेचे सावट, दूर करून जातो. ग्राफिटीच्या खाली लेखक/लेखिका किंवा संयोजकाचे नाव नसते. मग ग्राफिटीचे जनकत्व कुणाकडे द्यायचे? सुरवातीला मात्र एक स्त्रीलिंगी नाव असायचे. तेव्हाची एक सुंदर आठवणीत राहिलेली ग्राफिटी अशी होती. "मी मित्राबरोबर पळून गेल्यावर आईबाबांनी पहिली गोष्ट केली म्हणजे माझी खोली भाड्याने दिली.' अशा या मार्मिक, मिश्कील, सत्याचे दर्शन घडविण्याच्या ग्राफिटी या साहित्यप्रकाराचा शोध कुणी लावला, नेहमीचा रतीब कोण घालतो, त्या शब्दांना सजवतो कोण याची माहिती वाचकांना दिल्यास वाचकांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळेल असे वाटते. संपादकांनी वाचकांपुढे हे दालन खुले करावे.
- ग. ना. कापडी पर्वरी
हे तात्यासाहेबांच्या नाशकाचं..

"ग्राफिटी'ची शब्दखेळी भावते
"सकाळ'मधून प्रसन्न पानावरील प्रसन्न करणारी, प्रसंगी जळजळीत सत्य मांडणारी ग्राफिटी रोज वाचतोय. आता तर "सकाळ' हातात घेताच घरातील लहान- थोर मंडळी ग्राफिटी वाचून मनास "रिचार्ज करून घेतात आणि त्यानंतर बातम्या वाचण्यास सुरवात करतात. खरेच अतिशय मोजक्या शब्दांत यथार्थपणे केलेली शब्दखेळी निश्चितच सहृदय अभिनंदनास पात्र आहे. "ग्राफिटी'कारांचे मनस्वी अभिनंदन!
- मनोहर ना. आंधळे, चाळीसगाव

हे विदर्भाच्या भूमीचं...

"सकाळ'ची ग्राफिटी लाजवाब!
"सकाळ'मध्ये प्रसिद्ध होणारी दररोजची ग्राफिटी म्हणजे रसिक वाचकांना एक अनमोल नजराणाच आहे. याबद्दल "सकाळ'ला शतश: धन्यवाद! रोज निरनिराळ्या विषयांवर ग्राफिटी इतकी चपखलपणे भाष्य करते की वा! लाजवाब! माझ्याप्रमाणे इतरही असंख्या रसिक वाचक ग्राफिटीची कात्रणे कापून सुविचाराप्रमाणे एका डायरीत चिकटवून एक संग्रहच करीत असणार. आतापर्यंतच्या ग्राफिटीपैकी शक्य होतील तेवढ्या ग्राफिटींचे पुनर्मुद्रण केलेलीे एखादी विशेष पुरवणी "सकाळ'ने प्रसिद्ध करावी. रसिकांच्या आनंदालापारावर राहणार नाही. ग्राफिटींचा संग्रह करणाऱ्या माझ्यासारख्यांना हा एक दुग्धशर्करा योगच ठरेल.
- सुरेश एस. राजे राधाकृष्णनगरी, यवतमाळ.

हे प्रेम कोल्हापूरचं...

"ग्राफिटी' विद्यार्थ्यांनाही उपयुक्त
"सकाळ'मधील "ग्राफिटी' सदर म्हणजे मोजक्याच; परंतु अर्थपूर्ण शब्दांत वाचकांना जीवनाची बरीच तत्त्वे सांगून त्यांच्या जगण्याला बळकटी प्राप्त करून देणारे "टॉनिक'च होय. नवोदित सूत्रसंचालक, निवेदक, कथाकार, वक्ते यांच्यासाठी, तर एक पर्वणीच होय. चूक करावी, परंतु तीही अचूक. "मी उन्हाळ्याचा फॅन आहे,' अशा मार्मिक शब्द प्रयोगातून ग्राफिटी जणू भाषा सौंदर्याला नवसंजीवनी देऊन "माय मराठीपण' जपण्याचे उत्कृष्ट कार्य करीत आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही अशा वाक्यांचा संग्रह निबंध, भाषण यासाठी उपयुक्त आहे. "सकाळ' परिवाराने वाचकांच्या आग्रहास्तव ग्राफिटी पुस्तक प्रकाशित करून ज्ञानाचा प्रचंड खजिनाच उपलब्ध करून दिला. तो प्रत्येकाकडे असणे गरजेचेच आहे. एक उत्कृष्ट प्रबोधन कार्य, प्रभावी संदेश व प्रबळ जगण्याचे सौंदर्य या सर्वांचा सुंदर मिलाफ म्हणून "सकाळ'चे ग्राफिटी सदर महाराष्ट्रातील प्रत्येक वाचकाला भावणारे आहे.
-महेश घुगरे, महागाव (ता. गडहिंग्लज).
--------
आशयगर्भ "ग्राफिटी'
दैनिक "सकाळ'च्या "शिदोरी'मधील "ग्राफिटी' हा अल्पाक्षरी मजकूर अत्यंत आशयगर्भ असतो. रोज नवा विचार गुलाबकळ्यांवरच्या दवबिंदूसारखा लोभस असतो. कधी मनावरचे ताणतणाव कमी करणारा रंजक -रोचक; तर कधी जीवनाचे तत्त्व सांगणारा मार्गदर्शक. ग्राफिटी दोस्तासारखा वाटतो. रोजचा ग्राफिटी संग्रहणीय असून भेटकार्डावरून "भेट' म्हणून देण्यायोग्य आहे. शालेय विद्यार्थी, नवोदित वक्ते, सूत्रसंचालकांना हा मजकूर उपयुक्त आहे. ग्राफिटीमुळे "शिदोरी' रूचकर-अन् खुसखुशीत झाली आहे. "सकाळ'च्या हजारो वाचकांना "ग्राफिटी' नक्कीच मनापासून भावते.
-किरण पाटील, बटकणंगले (ता. गडहिंग्लज).
हे ठाण्याचं...

ग्राफिटी भावते
हॅपी बर्थ डे टू यू "टुडे'! "सकाळ'चा वाचक म्हणून आम्हाला अभिमान आहे. "नवी मुंबई टुडे'मुळे त्यात अधिकच भर पडली. "टुडे'त सादर होणारे गुडमॉर्निंग सदर तर आमच्याकडे सारेच जण वाचतात. सकाळी पेपर आला की प्रथम आम्ही वाचतो ती ग्राफिटी...! अतिशय मार्मिक भाष्य असलेली ग्राफिटी सर्वांनाच भावते. "टुडे'तील बातम्या सर्वसमावेशक असतात. "टुडे'ला शुभेच्छा!
- मृणाल सावे, कळंबोली.
हे चोखंदळ पुणेकरांचं...

सलाम ग्राफिटी!
"सकाळ'ची प्रत्येक ग्राफिटी गहिरे रंग घेऊनच भेटीला येत असते. कधी उपहास तर कधी विरोधाभास, कधी रेशीमचिमटा तर कधी जाणवण्याएवढा धक्का. कधी समाजजीवनावर मार्मिक टिप्पणी करता करता वर्मावर नेमके बोट ठेवणारी, तर कधी मानवी प्रवृत्तीची अचूक नाडी ओळखणारी. कधी विनोदाचा शिडकावा, तर कधी ढोंगीपणावर प्रहार करणारी. वाचकाचे बोट धरून अलवार पावलांनी चालायला लावणारी, तर कधी चालता चालता पायाखालची वाटच काढून घेणारी. बोचरी, गंभीर, मिस्कील, खोडकर ही तिची रूपं विलोभनीय वाटतात. मोजक्याच शब्दांतून वैचारिक व भावनिक कल्लोळ निर्माण करत, शाश्वत सत्याला स्पर्श करत वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या ग्राफिटीला सलाम!
- प्रा. वामन बोरकर, पुणे.
हे `बेरकी' नगरकरांचं...

ग्राफिटीने मन जिंकले
"सकाळ'मधील "प्रसन्न' या सदरातील "ग्राफिटी'च्या प्रेमात आम्ही पडलो आहोत. महाराष्ट्रात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने "लोकांना डोक्यावर घेऊ नका, मान लचकेल', "दुसऱ्याचं भलं व्हावं म्हणून वाटते ती तळमळ, अन् दुसऱ्याचं भलं झाल्यानंतर वाटते ती मळमळ' या दोन्ही ग्राफिटी संदर्भ साधून जनसामान्यांच्या डोक्यात प्रकाश टाकणाऱ्या आहेत. मोहक अक्षरांतून मोजक्या शब्दांत बोध देणाऱ्या ग्राफिटीला आमचे मनापासून धन्यवाद. "ग्राफिटी'चा हा "ग्राफ' असाच उंचावत जावो.
- डॉ. सी. एम. बोरा, सौ. कल्पना बोरा, राशीन
Subscribe to:
Posts (Atom)