सलाम ग्राफिटी!
"सकाळ'ची प्रत्येक ग्राफिटी गहिरे रंग घेऊनच भेटीला येत असते. कधी उपहास तर कधी विरोधाभास, कधी रेशीमचिमटा तर कधी जाणवण्याएवढा धक्का. कधी समाजजीवनावर मार्मिक टिप्पणी करता करता वर्मावर नेमके बोट ठेवणारी, तर कधी मानवी प्रवृत्तीची अचूक नाडी ओळखणारी. कधी विनोदाचा शिडकावा, तर कधी ढोंगीपणावर प्रहार करणारी. वाचकाचे बोट धरून अलवार पावलांनी चालायला लावणारी, तर कधी चालता चालता पायाखालची वाटच काढून घेणारी. बोचरी, गंभीर, मिस्कील, खोडकर ही तिची रूपं विलोभनीय वाटतात. मोजक्याच शब्दांतून वैचारिक व भावनिक कल्लोळ निर्माण करत, शाश्वत सत्याला स्पर्श करत वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या ग्राफिटीला सलाम!
- प्रा. वामन बोरकर, पुणे.
No comments:
Post a Comment